मी दादाभाऊ रामभाऊ जगदाळे एम.ए.एम.एड सेट शिक्षणशास्त्र , सेट मराठी, एम.ए.मानसशास्त्र/ पी.एच.डी.Appear. असून विषय साधनव्यक्ती म्हणून गटसाधन केंद्र घनसावंगी अंतर्गत DIET जालना येथे कार्यरत आहे.मागील 17 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. गुणवत्ता विकासासाठी शिक्षक आणि विदयार्थ्यांना मदत करणे हा माझा धर्म. आणि धर्म पालन करण्याच्या दृष्टिने या चॅनलवर शिक्षक व विदयार्थ्यांना मदतगार ठरतील असे गुणवत्तापूर्ण व्हिडीओ तयार करून आपल्यापर्यंत पोहचविण्याचा माझा निरंतर प्रयत्न असतो. आपले मिळणारे प्रेम मला अधिक कार्य करण्यास प्रेरणा देते. कृपया नवनवीन व्हिडीओ मिळविण्यासाठी 'फक्त शिक्षण' या चॅनलला सबस्क्राईब करा.