कै.डॉ.गोपाल गोविंद माने यांनी पशु होमिओपॅथी क्लिनिक इचलकरंजी चा पाया रचला. त्यांच्या निधनानंतर डॉ.अनिरुद्ध गोपाळ माने यांनी तो वारसा पुढे चालवला आणि वाढवला देखील.
डॉ.अनिरुद्ध माने यांचे गोपाळ पशु होमिओपॅथिक क्लिनिक,इचलकरंजी,गावभाग,शेळके गल्ली येथे स्थित आहे. या दवाखान्यामध्ये जनावरांना होमिओपॅथिक पद्धतीने उपचार दिले जातात. जनावरांच्या बहुतेक करून सर्व रोग आणि व्याधींवर येथे फक्त होमिओपॅथिक उपचार दिले जातात.
उदगाव आणि नांदणी येथील जैन बस्ती मधील हत्तींना डॉक्टर माने यांनी होमिओपॅथिक औषधाने बरे केले आहे. सध्या डॉक्टर माने यांच्यासोबत शिरोळ,हातकणंगले तालुक्यातील व इतर महाराष्ट्रातील मिळून असे 250 प्लस डॉक्टर काम करत आहेत.
डॉक्टर माने यांचे काम हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील ठरलेल्या ८० गावांमध्ये प्रत्यक्ष विजिट द्वारे होते व उर्वरित महाराष्ट्रात ते रिमोट वर्किंग द्वारे काम करत आहेत.