Login Register
G
Dr. Shekhar Rudra स्वरसंवाद

Dr. Shekhar Rudra स्वरसंवाद

@UCCnZazVRx2aPRC5FwF14eLg - 3.6K subscribers

नमस्कार, मी डॉ. शेखर रुद्र, धुळे,(संगीताचार्य, संगीत अलंकार, एम. ए. संगीत, NET) संगीत कलेचे बाळकडू घरातूनच मिळाले,नंतर आदर्श गुरुंकडून, व विविध विद्यापीठातून संगीत मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली.सध्या धुळे येथे 30 वर्षां पासून संगीत विद्यालय सुरू आहे.आज पर्यंत माझ्या विद्यालयातून २१० विद्यार्थी विशारद तर ३ विद्यार्थी अलंकार आणि २० विद्यार्थी संगीत एम.ए.झालेत.मी स्वतः अलंकार पर्यंतच्या परीक्षा घेण्यासाठी मान्यता प्राप्त परीक्षक आहे.माझे कार्यक्रम, विविध युवक महोत्सव परीक्षक म्हणून कार्य करताना असे जाणवले की शास्त्रीय संगीताबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता आहे, म्हणून त्यांना प्राथमिक माहिती देण्यासाठी मी नुकतेच YouTube वर माझे स्वर संवाद हे संगीत विषयक चॅनेल सुरू केले आहे. यात संगीताच्या प्रारंभिक माहितीपासून अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला आणि शिकायला मिळतील. संगीतप्रेमी,रसिक, संगीत शिक्षक आणि विशेषतः संगीत शिकणारे विद्यार्थी आणि परीक्षार्थी यांना याचा नक्कीच खूप फायदा होणार आहे. संगीत विषयक अधिकाधिक माहिती देण्याचा आणि रसिकांच्या शंकांचे समाधान करण्याचा माझा आटोकाट प्रयत्न यात असेल.