प्राजक्ता साकुरीकर ह्या संगीत कलाकार असून लहानपणापासूनच त्यांनी संगीत क्षेत्रात आपले योगदान दिलेले आहे. आपल्या सुमधुर आवाजाने आणि आपल्या गायकीने त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात एक विशिष्ट अशी ओळख निर्माण केलेली आहे. नाशिक अस्प्यारिंग सिंगर अवार्ड ने सन्मानित झालेल्या प्राजक्ता साकुरीकर ह्यांची विविध प्रकारातील आणि विविध रागांमधील गाणी ह्या चॅनलच्या माध्यमातून आपणा रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचतील. आपली त्यास मनापासून मिळालेली दाद हीच आम्हासाठी शाबासकी.