डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी, एम.डी. (मेडिसिन-कन्सल्टिंग र्ह्युमेटोलॉजिस्ट), ज्यांना सर्वजण प्रेमाने ‘सद्गुरु अनिरुद्ध बापू’ म्हणून ओळखतात, त्यांनी आपल्या प्रवचनांद्वारे असंख्यांना जीवनविषयक उचित मार्गदर्शन केले आहे. सत्य-प्रेम-आनंद या परमेश्वरी तत्त्वांवर आधारित त्यांच्या शिकवणीचा मूळ पाया भक्ती हाच आहे. प्रत्येक व्यक्तीचा, ‘प्रपंच’ व ‘परमार्थ’ या दोन्हींमध्ये उत्कर्ष होऊ शकतो कारण प्रपंच व परमार्थ हे परस्परविरोधी नसून, माणूस आपली सांसारिक कर्तव्ये पार पाडत असतानाही अध्यात्ममार्गावर चालू शकतो, असे ठाम प्रतिपादन ते करतात.
‘अनिरुद्ध बापू समग्र - बापू आणि त्यांचे विश्व’ चॅनल म्हणजे त्यांची शिकवण व कार्याचा परिचय करून देणारा एक झरोका. येथे त्यांची प्रवचने, श्रद्धावानांचे अनुभव पहायला मिळतील, तसेच त्यांच्या भक्तिमय सेवाकार्यांची माहिती मिळेल. त्याचबरोबर रामरक्षा, हनुमानचालीसा, पंचमुख हनुमत्कवच, करुणात्रिपदी यांसारखी पवित्र स्तोत्रे व मंत्रही उपलब्ध आहेत. हा चॅनल म्हणजे बापूंशी जोडले जाण्यासाठी व आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणू पाहणार्यांपर्यंत त्यांची कृपा पोहोचवण्यासाठी एक माध्यमच आहे.